New Marathi Ukhane For Groom

नवरदेवासाठी उखाणे / Marathi Ukhane For Groom
1) काही शब्द येतात ओठातून,
…… चं नाव येतं मात्र हृदयातून.
…… चं नाव येतं मात्र हृदयातून.
2) कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास,
मी भरवितो …… ला जलेबी चा घास.
मी भरवितो …… ला जलेबी चा घास.
3) भाजीत भाजी मेथीची,
……माझ्या प्रितीची.
……माझ्या प्रितीची.
4) पुरणपोळीत तुप असावे साजुक,
……. आहेत आमच्या फार नाजुक.
……. आहेत आमच्या फार नाजुक.
5) लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
…ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
…ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
6) सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप,
…………..मला मिळाली आहे अनुरूप.
…………..मला मिळाली आहे अनुरूप.
7) गाडीत गाडी डेक्कन क्वीन,
……. आहे माझी ब्युटी क्वीन.
……. आहे माझी ब्युटी क्वीन.
8) संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका,
……चे नाव घेतो सर्वजण ऐका.
……चे नाव घेतो सर्वजण ऐका.
9) नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
……..झाली आज माझी गृहमंत्री.
……..झाली आज माझी गृहमंत्री.
10) दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला,
सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
11) मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
12) मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
…………….चे बरोबर बांधली जीवन गाठ.
…………….चे बरोबर बांधली जीवन गाठ.
13) जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
…….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
…….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
14) पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे,
………चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.
………चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.
15) ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल,
………चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
………चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
16) अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर,
………..माझी सर्वांपेक्षा सुंदर.
………..माझी सर्वांपेक्षा सुंदर.
17) एक होती चिऊ, एक होता काऊ,
……..चे नाव घेतो डोक नका खाऊ.
……..चे नाव घेतो डोक नका खाऊ.
18) सनई चौघडा वाजतो सप्तसुरात,
…………. चे नाव घेतो……..च्या घरात.
…………. चे नाव घेतो……..च्या घरात.
19) निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान,
…..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.
…..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.
20) चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण,
………चे नाव घेऊन सोडतो कंकण.
………चे नाव घेऊन सोडतो कंकण.
Marathi Ukhane For Groom – For Marriage
21) रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन,
… च्या साथीने आदर्श संसार करीन.
22) जगाला सुवास देत उमलली कळी,
भाग्याने लाभली मला… प्रेमपुतळी,
23) हत्तीच्या अंबारीला मखमली झुल,
माझी … नाजुक जसे गुलाबाचे फुल.
24) सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल,
संसार करु सुखाचा … तु, मी आणि एक मुल.
25) लग्नाचा वाढदिवस करु साजरा,
… तुला आणला मोग-याचा गजरा.
26) कोरा कागज काळी शाई,
… ला रोज देवळात जाण्याची घाई.
27) संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका,
…चे नाव घेतो सर्व जण ऐका.
28) दारी होते कोनाडे त्यात होती पळी,
माझी … व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.
29) आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड,
… चंनाव आहे अमृतापेक्षा ही गोड.
30) श्रावण मारती भुदेवीने पांघरली हिरवी शाल,
… गेली माहेरी की होतात माझे हाल.
31) … माझे पिता … माझी माता,
शुभमुहूर्तावर घरी आणली … ही कान्ता.
32) जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध,
… च्या सहवासात झालो मी धुंद.
33) उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात,
नवनांचा हार … च्या गळ्यात.
34) तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल.
… चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल
35) प्रसन्न वदनाने आले रविराज,
… ने चढविला संसाराला स्नेहाचा साज.
Marathi Ukhane Navardevasathi
36) नाशिकची द्राक्षे नागपुरची संत्री,
… आज पासुन माझी गृहमंत्री.
37) काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात
प्रथम दर्शनीच भरली… माझ्या मनात,
38) रुप्याचा लोटा सोन्याची झारी,
असली काळीसावळी तर … माझी प्यारी.
39) सीतेसारखे चारीत्र्य, रंभेसारखे रुप,
… मिळाली आहे मला अनुरुप.
40) निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात,
अर्धागिनी म्हणुन … ने दिला माझ्या हातात हात.
41) सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग,
… माझी नेहमी घरकामात दंग,
42) मायामय नगरी, प्रेममय संसार, …
च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.
43) राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास,
मी देतो… ला लाडवाचा / करंजीचा घास,
44) जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र,
… च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.
45) जाईच्या वेणीला चांदीची तार,
माझी … म्हणजे लाखात सुंदर नार,
46) अस्सल सोने चोविस कॅरेट, …
अन् माझे झाले आज मॅरेज.
47) जीवनात लाभला मनासारखा साथी,
माझ्या संसार रथावर … सारथी.
48) हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी,
… च्या जीवनात मला आहे गोडी.
49) चंद्रला पाहून भरती येते सागराला,
… ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.
50) निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान,
… चे नावघेऊन राखतो सर्वाचा मान.
Marathi Ukhane for male
51) चंद्राचा होता उद्य समुद्रला येते भरती,
… दर्शनाने / स्पर्शाने सारे श्रम हरती.
52) जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,
… च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने,
53) वेरुळाची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर,
… आहे माझी सर्वा पेक्षा,
54) पंच पक्वांनाच्या ताटात वाढले लाडू पेढे,
ते नाव घेतांना कशाला हवे आढे वेढे,
55) उगवला सुर्य मावळली रजनी,
… चे नाव सदैव माझ्या मनी,
56) कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास,
… देतो मी लाडवाचा घास.
57) सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात,
… चे नाव घेतो … च्या घरात.
58) टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा,
‘… चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.
59) निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी,
… चे नावं घेतो… च्या घरी.
60) पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
… च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार,
61) श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी,
… च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी.
62) मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
… बरोबर बांधली जीवनगाठ.
63) मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा,
…चे नाव घेतो निट लक्ष ठेवा.
64) आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर,
… च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.
65) चांदीच्या ताटात, रुपया वाजतो खणखण,
… चे नव घेऊन सोडतो आता कंकण.
Marathi Ukhane for Pooja
66) पुढे जाते वासरु, मागुन चालली गाय,
… ला आवडते नेहमी दुधावरची साय,
67) संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी,
… मुळे लागली मला संसाराची गोडी.
68) नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व,
… आहे माझे जीवन-सर्वस्व.
69) रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे,
… ला पाहून चंद्र-सुर्य हसे.
70) पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले,
… चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.
71) हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात,
… च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.
72) मातीच्या चुली घालतात घरोघर,
… झालीस माझी आता चल बरोबर.
73) शंकरा सारखा पिता अन् पार्वती सारखी माता,
… राणी मिळाली स्वर्ग आला होता.
74) नभांगणी दिसे शरदाचे चांदणे,
.. चे रुप आहे अत्यंत देखणे.
75) भारत देश स्वतंत्र झाला, इंग्रज गेले पळून,
… चे नाव घेतो जरा पहा मागे वळून.
76) बहरली फुलांनी निशीगंधाची पाती,
… चे नाव घेतो लग्नाच्या राती.
77) ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल,
…चे नाव घेतो तुमच्या साठी स्पेशल.
78) आपल्या देशात करावा हिन्दी भाषेचा मान,
…चे नाव घेतो ऐका सर्व देऊन कान,
79) देवळाला खरी शोभा कळसाने येते,
… मुळे माझे गृहसौख्य दुनावते.
80) देवा जवळ करतो मी दत्ताची आरती,
… माझ्या जीवनाची सारथी.
Marathi Ukhane for Griha Pravesh
81) स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाणे वाढविली शान,
…चे नाव घेतो ठेऊन सर्वाचा मान,
82) काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध,
… सोबत जीवनात मला आहे आनंद.
83) अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा,
…. ला घास घालतो वरण-भात-तुपाचा.
84) देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले,
… शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.
85) श्रावण महीन्यात प्रत्येक वारी सण,
… ला सुखात ठेवीन हा माझी पण.
86) नंदनवनीच्या कोकिळा बोलती गोड,
… राणी माझा तळहाताचा फोड.
87) नंदनवनात अमृताचे कलश,
… आहे माझी खुप सालस.
88) देवाला भक्त करतो मनोभारे वंदन,
… मुळे झाले संसाराने नंदन,
89) भाजीत भाती मेथीची,
… माझी प्रितीची,
90) दही चक्का तुप,
… आवडते मला खुप.
91) हिरळीवर चरती सुवर्ण हरिणी,
… झाली आता माझी सहचारिणी.
92) आंथरली सतरंजी त्यावर पांघरली शाल,
… रावांच्या जीवनात… राहील खुशाल.
93) आंब्याच्या झाडावर बसुन कोकीळा करी कुजन,
माझ्या नावाचे… करी पुजन.
94) श्रीकृष्णाने केला पण रुक्मीणीलाच वरीन,
… च्या सोबत आदर्श संसार करीन.
95) चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा,
… रावाच्या जीवावर … मारते मौजा.
96) सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली,
… राणी माझी घरकामाता गुंतली.
Smart Marathi Ukhane Male
Kahi Shabd Yetat Othatun,
…..Cha Naav Yet Matra Hrudyatun.
…..Cha Naav Yet Matra Hrudyatun.
Kolhapurla Aahe Mahalakmicha Vas,
…… Mi Bharavito Jalebi Cha Ghas.
…… Mi Bharavito Jalebi Cha Ghas.
Bhajit Bhaji Methichi,
…………Majhya Pritichi.
…………Majhya Pritichi.
Puranpolit Tup Asave Sajuk,
…… Aahet Aamchya Far Najuk.
…… Aahet Aamchya Far Najuk.
Laksh Laksh Divyasarakhe Ujalat Rahte Eknishtha Prem,
……..Chi Majhya Hrudayat Korali Geli Ekmev Frem.
……..Chi Majhya Hrudayat Korali Geli Ekmev Frem.
Sitesarakh Charitra, Lakmi Sarkh Rup,
………….Mala Milali Aahe Anurup.
………….Mala Milali Aahe Anurup.
Gadit Gadi Dekkan Queen,
……Aahe Majhi Beauty Queen.
……Aahe Majhi Beauty Queen.
Sansarrupi Sagarat Pati Patnichi Nauka,
………Che Naav Gheto Sarvjan Eaika.
………Che Naav Gheto Sarvjan Eaika.
Nashikchi Drakshe, Nagpurchi Santri,
………Zali Aaj Majhi GruhMantri.
………Zali Aaj Majhi GruhMantri.
Durvachi Judi Vahato Ganpatila,
Sau……..Sarakhi Patni Milali Aanand Zala Mala.
Sau……..Sarakhi Patni Milali Aanand Zala Mala.
Moh Nahi, Maya Nahi, Nahi Matsar Heva,
………..Che Naav Gheto Nit Laksh Theva.
………..Che Naav Gheto Nit Laksh Theva.
Mohmaya Snehachi Jali Pasarli Ghandat,
………….Che Barobar Bandhali Jivan Gath.
………….Che Barobar Bandhali Jivan Gath.
Janm Dila Matene, Palan Kele Pityane,
……..Che Galyat Mangalsutra Bandhato Pramane.
……..Che Galyat Mangalsutra Bandhato Pramane.
Panchpakvanachya Tatat Vdhale Jilebi, Pedhe,
………Che Nav Ghyayala Kashala Aadhe Vedhe.
………Che Nav Ghyayala Kashala Aadhe Vedhe.
Tajmahal Bandhayala Karagir Hote Kushal,
………Che Naav Gheto Tumachyasathi Special.
………Che Naav Gheto Tumachyasathi Special.
Ajintha Verulchi Shilpe Aahet Sunder,
……… Majhi Sarvanpeksha Sunder.
……… Majhi Sarvanpeksha Sunder.
Ek Hoti Chiu, Ek Hota Kau,
…………Che Naav Gheto Dok Naka Khau.
…………Che Naav Gheto Dok Naka Khau.
Sanayi Chaughada Vajato Saptsurat,
……Che Naav Gheto …….Chya Gharat.
……Che Naav Gheto …….Chya Gharat.
Nile Pani, Nile Aakash, Hirave Hirave Ran,
…………. Che Naav Gheto Theun Sarvancha Maan.
…………. Che Naav Gheto Theun Sarvancha Maan.
Chandichya Tatat Rupaya Vajato Khankhan,
……..Che Naav Gheun Sodato Kankan.
……..Che Naav Gheun Sodato Kankan.
नक्की पहा :- नवरीसाठी भरपूर उखाणे (एकदम नवीन)
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Marathi Ukhane For Groom असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Kiti Chan ukhane. Kharch thank you
ReplyDelete