शिक्षण || मराठी सुविचार । Education Quotes in Marathi | Marathi Suvichar

Education Quotes in Marathi

-
![]() |
Education Quotes in Marathi |
तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.
जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मान-अपमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी,
प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.
आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
स्वातंत्र्य म्हणजे संयम..... स्वैराचार नव्हे.
प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका...
स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद.
स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते तोच खरा शिक्षक!
समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही
तो आदर्श शिक्षकांमुळे होतो.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.
ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे,
जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग बदलताना बघू शकता.
शिक्षक जीवनाचे दार उघडत असतो,
तर विद्यार्थ्यालाच त्यातुन प्रवेश करायचा असतो.
शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे
आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
शब्दांसारख शस्त्र नाही,
त्यांचा वापर जपुनच करावा.
विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
विचार न करता शिकणे हे निरुपयोगी असते
तर न शिकता विचार करणे हे धोकादायक असते.
वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे.
आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.
आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते....
ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते
आणि ह्रदय हरून देखील जिंकलेलं असतं.
नेहमी तत्पर रहा....
बेसावध आयुष्य जगू नका.
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.
कले शिवाय जीवन म्हणजे सुगंधा शिवाय फूल
आणि प्राणा शिवाय शरीर!
बदलण्याची संधी नेहमी असते
पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का?
आयुष्यात असं काहीतरी मिळवा
जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.
स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
या ह्रदयीचे त्या ह्रदयी देता येते तोच खरा शिक्षक.
माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.
प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे,
म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे.
पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा आहे.
पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही.
परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे.
दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित.
No comments:
Post a Comment