- कुत्रा चावल्या नंतरचे उपचार | Treatment on dog bites in Marathi

Wednesday, April 8, 2020

कुत्रा चावल्या नंतरचे उपचार | Treatment on dog bites in Marathi


Treatment-on-dog-bites-in-Marathi


बऱ्याच लोकांना पाळीव प्राणी पाळायला आवडते. कुत्रा, मांजर, घोडे किंवा पक्षी पाळतात. पण काही प्राण्यांच्या चावण्याने आजार होतात. विशेषतः कुत्राच्या चावण्याने खूप गंभीर आजार होतो. वेळीच उपचार नाही केले तर आपल्या जिवाला धोका ही पोचू शकतो. डॉक्टरांच्या नुसार कुत्रा चावल्यावर आपल्याला विशेष लक्ष दिले पाहिजे.

दारू सोडण्याचे उपाय 




कुत्र्याने चावलेल्या जागेवर कोणत्या हि प्रकारचा कापड किंवा पेपर बांधू नये. तो घाव तसाच उघडा ठेवा. जखम साबणाने धुऊन घेतली पाहिजे. जर आपल्या घरात अल्कोहोल असेल तर तो एक एन्टीसेप्टिक म्हणून कार्य करते, अलकोहोल आपल्या जखमेवर टाका. आणि डॉक्टर ला दाखवा व इन्फेक्शन (संसर्ग) पासून वाचण्यासाठी इंजेक्शन घेणे जरुरी आहे. जर कुत्रा पिसाळलेला असेल किंवा त्याला इतर रोग झाला असेल तर ते आपल्या जिवावर बेतू शकते म्हणून त्वरित डॉक्टर कडे जाऊन उपचार घ्यावेत.


रेबीज एक खूप गंभीर आणि धोकादायक वायरस आहे आणि ज्याच्या मुळे खूप घातक आणि जिवघेणा आजार होतो आणि हा आजार जास्त करून कुत्र्याच्या चावण्याने होतो. जर कुत्र्याला किंवा इतर प्राण्याला रेबीज असेल आणि जर तो कुत्रा माणसाचला चावला तर कुत्र्याच्या लाळे द्व्यारे रेबीज माणसाच्या शरीरात पसरतो. रेबीज हा जास्तकरून मासांहारी प्राण्याच्या चावण्याने पसरतो. अजून हि काही जंगली प्राणी आहेत त्यांच्यामुळे रेबीज होतो उदा. कोल्हा, चित्ता, लांडगा इत्यादी आणि जंगला मध्ये बरचसे प्राणी या आजाराने मरतात.

हा वायसर मेंदू मध्ये नसांच्या माध्यमातून घुसतो, रक्ता मधून नाही. कुत्रा चावल्यानंतर लाळे द्वारे वायरस जखमेत येतो. आणि वायरस स्थानीय नसेच्या तंतू मध्ये पोचतो. इथून सगळ्या नसांनमधून मेरुदंड आणि मेंदूत प्रवेश करतो. ज्या ठिकाणी कुत्रा चावलेला असेल तिथे नस जेवढी लांब असेल तेवढा हळू वायरस मेंदूपर्यंत पसरतो. यामुळे आपल्याला उपचार करण्यासाठी जास्त वेळ मिळतो.


रेबीज ची लक्षणे

कुत्रा चावल्या नंतरचे उपचार



चावल्याच्या ठिकाणी वेदना होणे, त्या ठिकाणी हलकी संवेदनहीनता होणे आणी कधी कधी खाज सुटणे, ताप येणे. हे काही प्राथमिक लक्षणे आहेत. रेबीज मुळे पुढे बेशुद्धपणा, भुरकट दिसणे, पाणी प्यायला भीती वाटते, हिंसात्मक होणे अशी काही लक्षणे दिसून येतात आणि या रोगाला अलर्क हि म्हणतात.

कुत्र्याच्या चावण्याने पेशण्टला एन्टी सिरम इंजेक्शन दिला जातो. या आजारावर कोणताही एन्टीबायोटीक नाही म्हणून एन्टी सिरम इंजेक्शन घेणे जरुरी आहे. कारण हा रेबीज च्या वायरसला नष्ट करायला मदत करतो पण हे खूप महाग औषध आहे, आयुर्वेदात हि कुत्राच्या चावण्यावर उपचार आहेत जे कमी खर्चिक आहेत.


आयुर्वेदिक उपाय करण्यासाठी चिंचेच्या बिया घ्या आणि लसणाच्या काही पाकळ्या घ्या. चिंचेच्या बिया साफ करून त्याचा वरचा साल काढून घ्या आणि या बिया लसणा सोबत वाटून घ्या आणि हा लेप जखमेवर लावा. काही वेळ हा लेप असेच ठेवा. जास्तीत जास्त विटामिन सी युक्त आहाराचे सेवन करा कारण यामुळे संक्रमणासोबत लढण्यास सहायता मिळते. तसेच यामुळे शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढते.


कुत्रा चावल्या नंतरचे उपचार | Treatment on dog bites in Marathi


सर्वात प्रथम घाव स्वच्छ धुऊन घ्या आणि पेशण्टला Hydorfobinium 200 औषध द्या आणि हे औषध पूर्णतः होमिओपॅथी आहे. हे औषध आपल्याला कोणत्याही आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात मिळेल. आणि हे औषध कसे वापरावे आपल्याला जाणून घेणे आवश्यक आहे. हे औषध ज्या व्यक्तिला कुत्रा चावला आहे त्याला दर १० मिनिटांनी ३ – ३ थेंब पाजले पाहिजे. याच्या वापराने रोगी ठीक होईल.


हा आजार रेबीजच्या कुत्राने चावल्यावर पसरतो किंवा पिसाळलेला कुत्रा चावल्यावर पसरतो. जर कुत्रा चावला असेल तर त्वरित डॉक्टर कडे जावे.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

No comments:

Post a Comment